B.Sc.III Students Achieves Consolation Prize in Project Competition Organized by the Department of Statistics, Shivaji University, Kolhapur, and SUSTA
एल.बी.एस. कॉलेज, सातारा येथील सांख्यिकी विभागाची उल्लेखनीय कामगिरी!
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील संख्याशास्त्र अधिविभाग आणि शिवाजी विद्यापीठ संख्याशास्त्र शिक्षक संघटना (SUSTA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बी.एस्सी. तृतीय वर्ष सांख्यिकी विद्यार्थ्यांसाठीच्या प्रोजेक्ट प्रेझेंटेशन स्पर्धेत लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, सातारा येथील सांख्यिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत Consolation Prize प्राप्त केला.
या स्पर्धेचा विषय होता – 📊 “माझ्या परिसरातील प्रति व्यक्ती मासिक वाहन इंधन वापराचा अंदाज”
विद्यार्थ्यांनी सांख्यिकीय पद्धतींचा प्रभावी वापर करून डेटा संकलन, विश्लेषण आणि निष्कर्षांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यांच्या संशोधनवृत्ती, विश्लेषणात्मक दृष्टिकोन आणि सादरीकरण कौशल्याचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले.
ही स्पर्धा दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे आयोजित “वास्तविक समस्यांचे सांख्यिकीय अन्वेषण” या एकदिवसीय कार्यशाळेच्या निमित्ताने घेण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, विभागप्रमुख व सर्व प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले.

No comments:
Post a Comment